‘कुत्रा आहे, भुंकतोय, भूंकू द्या’, अकबरुद्दीन औवेसींची राज ठाकरेंवर टीका

औरंगाबाद –  राज्यात आता मनसे विरुद्ध एमआयएम (MNS vs MIM) असा वाद पेटताना दिसत आहे. औरंगाबादेत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी सभा घेत मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिल होत. आता यावरूनच एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी (MIM leader Akbaruddin Owaisi) यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

माध्यमात आलेल्या वृत्तानुसार, यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता अतिशय टोकाच्या शब्दांमध्ये टीका केली.  कुत्रा आहे, भुंकतोय, जे पण भुंकतोय ते भुंकू द्या. कुत्र्याचं काम भुंकण्याचं आहे. वाघाचं काम शांतपणे चाललं जाणं आहे. बस भुंकू द्या. काहीच गरज नाही. वेळ आणि परिस्थीला समजा. त्यांच्या जाळ्यात अडकायचं नाहीय. ते जाळ गुंफत आहेत. ते तुम्हाला जाळ्यात फसवू इच्छित आहेत. तुम्ही फसू नका, असा घणाघात अकबरुद्दीन ओवेसी यांनी केला.(MIM leader Akbaruddin Owaisi’s speech in Aurangabad)

अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले की, ”मी येथे कोणाला उत्तर द्यायला आलो नाही. मी कोणाला वाईट बोलायला आलो नाही. तसं करण्याची मला गरज ही नाही आहे. आमचा तर एक खासदार आहे, तुम्ही तर बेघर आहे, तुम्हाला काय उत्तर देणार. ज्याला घरातून बाहेर काढलं आहे, त्याला काय उत्तर द्यायचं.