LokSabha Election 2024 | आता तो ‘सामना’ राहिला नाही, ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करताच नितेश राणेंनी सोडले टीकास्त्र

LokSabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election 2024) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाची यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील 17 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे. यावरुन भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

आता तो “सामना” राहिला नाही.. मोठे साहेब उमेदवारांच्या नावाची घोषणा ‘सामना’तूनच करायचे .. शिवसैनिक आतुरतेने वाट बघायचे.. आता silver oak चा भोंगा आणि १० जनपथचा पगारी नोकर यादी टाकतो .. काय दिवस आले.. “सामना” आता फक्त black चे white करण्यासाठी आहे का?, असा प्रश्न उपस्थित करत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Murlidhar Mohol : …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar | आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार