अमिषा पटेलने संजय राऊतांना मारली मिठी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; पहा व्हिडीओ

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्या परखड स्वभावाबद्दल आणि वक्तव्याविषयी ओळखले जातात. मात्र आता ते सोशल मीडियावर एका (Amisha Patel) व्हिडिओमुळेचर्चेत आले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये  त्यांना बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेलनं झप्पी दिली आहे.

मुंबईत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचे ट्रेलर लाँच झाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता सलमान खान यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि अभिनेते हजर होते. अमिषा पटेलनेही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

अमिषा पटेलची धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमला एन्ट्री होताच आयोजकांनी तिची संजय राऊत यांच्याशी भेट घालून दिली. अमिषा आल्याचं पाहताच संजय राऊत यांनी स्वतः खुर्चीवरून उठून तिचं स्वागत केलं. त्यावेळी अमिषाने हस्तांदोलन करत संजय राऊत यांची गळाभेट घेतली. त्यानंतर अमिषा पटेल आणि संजय राऊत यांच्यात काही वेळ चर्चाही झाली. पुढे अमिषा इतर पाहुण्यांना भेटत पुढे  गेली. (Amisha patel and Sanjay Raut’s video)

यानंतर स्वतः अभिनेत्री अमिषा पटेल देखील संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला. या ट्वीटमध्ये तिने म्हटलं, “संजय राऊत यांची धर्मवीर मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात भेट झाली. धर्मवीर चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा.”

हा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत . दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. तसेच रितेश देशमुख आणि सलमान खान या सेलिब्रिटींनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. धर्मवीर या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओकनं प्रमुख भूमिका साकारली आहे. झी स्टुडिओज आणि मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सनं धर्मवीर चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रविण तरडेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.  13 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.