शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी पिक कर्ज उपलब्ध करून देण्यावर भर द्या : दादाजी भुसे

नाशिक – शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी पिककर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत (Financial aid) उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दर आठवड्याला बैठक घेवून शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी पिक कर्ज (Crop loans to farmers before sowing) उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नॅनो युरियाचा वापर करून त्याचा ड्रोनमार्फत फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी. तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतंर्गत करण्यात आलेल्या कर्ज पुरवठ्याचा अहवाल नव्याने शासनास सादर करावा, असेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले आहे.

खरीप हंगामाच्या दृष्टिने आवश्यक प्रमाणात खत, बियाणे व इतर निविष्ठांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच खत विक्रेत्यांच्या मागणी व पीक पद्धतीनुसार तालुकानिहाय रासायनिक खतांचे वितरण करण्यात येणार असून खतांच्या विक्री व वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका, जिल्हा व विभागनिहाय 17 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्याला खरीप हंगामासाठी खत, बियाणे व इतर निविष्ठांचा पुरवठा कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देखील कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीत दिली आहे.

बैठकीच्या सुरूवातीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे (District Superintendent Agriculture Officer Vivek Sonawane) यांनी कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजना, नियोजनाचे सादरीकरणाद्वारे बैठकीत माहिती सादर केली.