केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी लीन, शिंदे आणि फडणवीसांनीही टेकवला माथा

Amit Shah Visits Lalbaugcha Raja: मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक असलेला लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) जगभरात ख्याती आहे. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या राजाच्या दर्शनसाठी देशभरातून भक्तांची रांग लागते. सामान्यांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकारण्यांपर्यंत प्रत्येकजण लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आवर्जुन जातो. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आले आहेत.

अमित शाह आज दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते वांद्रे येथे गेले. अमित शाह यांनी वांद्रे येथे जावून भाजप आमदार आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती मंडळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते वरळी सी लिंक मार्गाने लालबागच्या दिशेला रवाना झाले. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. यावेळी अमित शहांबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिसले.

महत्वाच्या बातम्या-
Relationship Depression आहे खूप धोकादायक, दोन आयुष्य उध्वस्त होऊ शकतात

‘माझा विश्वास आहे की अल्लाह सर्व काही…’ वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर नसीम शाह भावूक

Sharad Ponkshe : ‘बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता’