मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळालं तर आपला सरपंचही होणार नाही – भुजबळ

Chhagan Bhujbal – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होत असल्याने ऐन थंडीत राज्यातील वातावरण तापले आहे. यातच आता मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळालं तर आपला सरपंचही होणार नाही, असं म्हणत पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी सभेतून (OBC Sabha) हल्लाबोल केलाय.

भिवंडीमध्ये (Bhiwandi) ओबीसी निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेमध्ये पुन्हा एकदा भुजबळांनी आक्रमक भाषण करत मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) निशाणा साधलाय. मराठा समाजाला आमचा विरोध नाही, तर आमचा विरोध हा गुंडगिरी, जाळपोळ करणाऱ्यांना आणि झुंडशाहीला आहे, असं म्हणत भुजबळांनी टीकास्त्र सोडले आहे.

सरकार किती झुकणार जरांगेसमोर. त्याच्या पाया पडतायत, त्याला विनंती करतायत. सरकारला धमकी देणाऱ्यासमोर, जाळपोळ करणाऱ्या समोर तुम्ही झुकताय, असं म्हणत भुजबळांनी सरकारवर भाष्य केलं.

महत्वाच्या बातम्या-

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न?

जान्हवी कपूर आणि नीसा देवगण ‘या’ व्यक्तीसोबत लंडनमध्ये करत आहेत सुट्या एन्जॉय

एकनाथ खडसेंनी पक्षात राहून चोऱ्या केल्या, त्यामुळंचं त्यांना पक्षानं हाकलून दिलं – महाजन