शिरूर मतदारसंघातून यंदा अमोल कोल्हे लोकसभा लढवण्यात इच्छुक नाहीत?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता मोर्चेबांधणी करत आहेत. मात्र  राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. गेले दोन दिवस लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहे. स्वतः शरद पवार (Sharad Pawar) त्या-त्या मतदारसंघातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतायेत. कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव देवकर, अनिल पाटील हे नेते विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत.

दुसरीकडे, शिरूर मतदारसंघातून यंदा अमोल कोल्हे (Amol Kolhe) लोकसभा लढवण्यात इच्छुक नाहीयेत. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांना लोकसभेचं तिकीट मिळेल अशी चर्चा आहे. मात्र वळसे सध्या परदेशात असल्यानं यावर ५ जून रोजी चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. तर माढ्यामधून संजीव राजे नाईक निंबाळकर हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय.एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.