.. म्हणून जूनियर एनटीआर २१ दिवस अनवाणी राहणार आणि खाणार सात्विक भोजन

मुंबई – दिग्दर्शक एसएस राजामौली (Director SS Rajmouli) यांच्या ‘आरआरआर’ (RRR Movie) चित्रपटाच्या रिलीजपासून दक्षिणेतील अभिनेते राम चरण (South Actor Ram Charan)आणि ज्युनियर एनटीआर (Junior NTR) चर्चेत आहेत. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने जगभरातील चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडवून दिली. अगदी त्याच्या हिंदी आवृत्तीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, ज्युनियर एनटीआर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण चित्रपट नसून अध्यात्म आहे.

‘RRR’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता राम चरणने सबरीमाला मंदिरात (Sabrimala Mandir) जाऊन दीक्षा घेतली. आता ज्युनियर एनटीआर बद्दल बातम्या येत आहेत की त्यानेही दीक्षा घेतली आहे, अशा स्थितीत तो सुमारे २१ दिवस अनवाणी राहणार असून, एवढेच नाही तर दीक्षा नियमांचे पालन करण्यासाठी तो सात्त्विक आहारही घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (one of his photos is viral on social media), ज्यामध्ये तो भगव्या रंगाचा कुर्ता पायजमा, गळ्यात माळ आणि कपाळावर टिळक घातलेला दिसत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता ज्युनियर एनटीआर एका मंदिरात पूजा करताना आणि दीक्षा घेताना दिसला. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी हनुमान जयंतीला पूजा केली होती आणि यावेळी ते भगव्या कपड्यात दिसला. आता अशा परिस्थितीत त्याचा व्हायरल फोटोमधील लूक पाहून तो धार्मिक दृष्ट्या घेतलेली दीक्षा पाळत असल्याचे बोलले जात आहे. सुमारे २१ दिवस तो अनवाणी पायाने आणि सात्विक अन्न खाणार असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, ज्युनियर एनटीआरच्या आधी मेगास्टार राम चरण यांनीही अयप्पाची दीक्षा घेतली होती. ते ४५ दिवसांचे नियम पाळत आहेत. कारण, याआधी ‘RRR’च्या सक्सेस पार्टीमध्ये राम चरण अनवाणी दिसले होते.