आपली मूलं परदेशात पाठवून इथल्या तरुणांमध्ये अस्वस्थता पसरवायची, हे डॉक्टरला शोभत नाही – पालकमंत्री

मुंबई – आपली मूलं परदेशात पाठवायची व इथल्या तरुणांमध्ये अस्वस्थता पसरवायची, असं करणं एका डॉक्टरला ( Doctor ) शोभत नाही” असा उपाहासात्मक टोला लगावत अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर ( Add. Yashomati Thakur ) यांनी टिकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत. आज मुंबईत ( Mumbai ) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अमरावती ( Amravati ) जिल्ह्यातील अचलपूर ( Achalpur ) येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधक चुकीचे आरोप करीत असताना ॲड. यशोमती ठाकूर यांनी त्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर दिले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले अनिल बोंडे ( Anil Bonde ) भाजपामध्ये गेले आणि पराभूत झाले. तेव्हापासून त्यांच्या डोक्यावर फरक पडल्याचे दिसत आहे. अनिल बोंडे अतिशय विक्षिप्तपणाने बोलले आहेत. त्यांच्या डोक्यावर थोडा फार फरक झाल्याचा दिसतोय. मागच्यावेळी जेव्हा दंगल झाली, त्यावेळी लोकांना त्यांनी उद्युक्त केले होते आणि आता या ही वेळेला ते काहीही बोलत असून लोकांना भडकवत आहेत. अमरावतीमध्ये अस्वस्थता, अशांतता पसरविण्याचे काम करीत आहेत. अमरावतीमधला सलोखा कायम राहिला पाहिजे. जनता यांना माफ करणार नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आपल्या अमरावतीमधील सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचे काम बोंडे यांच्यासारखी मंडळी करीत आहेत. मात्र आपण हे सलोख्याचे वातावरण आहे तसेच राहायला हवे असा प्रयत्न करूया. शांत झालेली अमरावती अशांत करण्यासाठी ते इतरांना उद्युक्त करत आहेत. राहिला प्रश्न अनिल बोंडे यांचा तर ते कुणाच्या खुंट्याला बांधले गेले आहेत हे जनतेला माहित आहे. आपली मूलं परदेशात पाठवायची आणि इथल्या तरुणांमध्ये अस्वस्थता पसरवायची, हे करणं एका डॉक्टरला शोभत नाही. असा सणसणीत टोलाही ॲड. यशोमती ठाकूर यांनी त्यांना लगावला.