Andheri East Bypoll 2022 : ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा

मुंबई – ऋतुजा लटके यांना हायकोर्टाचा दिलासा दिला आहे.ऋतुजा लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी ११ पर्यंत मंजूर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ऋतुजा लटके यांना या निर्णयामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीने सुनावणी झाली. यात न्यायालयाने लटके यांना दिलासा दिला दिला.

दरम्यान, या निर्णयाने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे.ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.