ठाकरेंना खरच ऋतुजा लटके यांना उमेदवारी द्यायची आहे की सहानुभूतीचा फायदा घ्यायचा आहे?

अमरावती – अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll 2022) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातही निवडणूक भाजपऐवजी (BJP) शिंदे गट (CM Eknath Shinde) लढण्याची शक्यता आहे. यातच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत.

या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांना खरच ऋतुजा लटके यांना उमेदवारी द्यायची आहे की? त्यांच्याजागी दुसरा एखादा उमेदवार उभा करून त्यांच्या सहानुभूतीचा फायदा घ्यायला आहे? हे आधी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावं असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांना जर लटके कुटुंबाविषयी एवढीच सहानभुती होती, तर त्यांनी स्पष्ट करावं की ते रमेश लटके यांना कितीवेळा भेटले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख झाल्यानंतर त्यांनी रमेश लटके यांना वेळ दिला का? त्यांना किती वेळ मातोश्रीबाहेर उभे राहावे लागेल, असा खोचक सवाल देखील नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.