आंद्रे रसेलने झोडपले पंजाब किंग्स, कोलकाताने मिळवला दुसरा विजय  

मुंबई – मुंबईत येथे खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या आठव्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना पंजाब किंग्जचा संघ १३७ धावांत सर्वबाद झाला. मात्र, यानंतर त्याने केकेआरच्या सात षटकांत ५१ धावांत चार गडी बाद केले होते. मात्र यानंतर आंद्रे रसेलने तुफानी खेळी करत केकेआरला विजय मिळवून दिला.

कोलकाता नाईट रायडर्सच्या या धमाकेदार विजयाचा हिरो ठरला आंद्रे रसेल. त्याने अवघ्या 31 चेंडूत नाबाद 70 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि आठ षटकार आले. त्याच्यासोबत सॅम बिलिंग्जही 24 धावांवर नाबाद परतला. बिलिंग्जच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आला.