खरी ठाकरी शैली आणि भाषा आज पहायला-ऐकायला मिळणार… बाकी खेळ ”…….”

मुंबई : दरवर्षी गुढी पाडव्याला (Gudipadwa) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांची तोफ शिवतिर्थावर (Shivtirth )जोरदार धडाडते. आजही मनसेच्या (MNS)कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रला तेच पहायाला मिळणार आहे. मनसैनिकांना तसेच महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवाना मनसेचे प्रमुख राज ठाकरेंच्या (Raj Thackeray Speech) भाषणाची प्रतीक्षा आहे. गेल्या वेळी वर्धापन दिनाला राज ठाकरेंनी पुण्यात अनेकांचा समाचार घेतला. मात्र यावेळी बोलता बोलता राज ठाकरे म्हणाले हे माझं आजचं भाषण म्हणजे फक्त टिझर (Mns Teaser) आहे. पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थावर असे थेट संकेत दिले होते. त्यामुळे या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राजकीय सभांवर काही मर्यादा आल्याने राज ठाकरे नावाची नेहमी धडाडणारी तोफ काही काळ थंड होती. मात्र आता कोरोनाही कमी झाल्याने सण साजरे करायला थोडीफार मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे शिवतिर्थावर पुन्हा राज ठाकरेंची थोफ विरोधकांना घायळ करण्यासाठी सज्ज झाली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते योगेश चिले यांनी एक लक्ष्यवेधी ट्वीट करून विरोधकांना डिवचले आहे. खरी ठाकरी शैली आणि भाषा आज पहायला-ऐकायला मिळणार… बाकी खेळ ”;……. ” सर्वांना नववर्षाच्या मनापासुन शुभेच्छा… असं चिले म्हणाले आहेत.