अनिल बोंडे स्वतःच्या मुलांना बाहेर देशात पाठवून अमरावतीच्या तरुणांची माथी भडकवत आहेत – ठाकूर 

अमरावती – अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अचलपूर (achalpur) शहरात (17 एप्रिल) रात्री 9:30 वाजेच्या सुमारास दुल्ला गेट ( Dullah Gate) परिसरातील एक झेंडा (Flag) काढल्याचा वादावरून दोन गटात हिंसाचार (Violence) झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात बराच वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आता या घटनेवरून राजकीय आरोप – प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

दरम्यान हिंसाचाराचे आरोप असणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष अभय माथने (BJP city president Abhay Mathane) याला पोलिसांनी पुण्यातून (Pune) अटक केली आहे. यानंतर आता पालकमंत्री यशोमती ठाकूर (Guardian Minister Yashomati Thakur) याच अचलपूरमधील घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते अनिल बोंडे (BJP leader Anil Bonde) यांनी केला आहे.

यावर बोलताना अनिल बोंडे म्हणाले की, या दंगलीमागे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नसून या जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या खऱ्या मास्टर माईंड असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यशोमती ठाकूर यांचा सहभाग असल्यामुळेच त्या मोर्चामध्ये सहभागी असलेल्या मुस्लिमांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही बोंडे यांनी केला आहे.

दरम्यान, या आरोपांना ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, अनिल बोंडे अतिशय विक्षिप्त (Deranged) वागत आहेत. ते कुणाच्या खुंट्याला बांधले गेले आहेत हे जनतेला माहित आहे. अमरावती अशांत करण्यासाठी ते उद्युक्त करत आहेत. स्वतःच्या मुलांना बाहेर देशात पाठवत, अमरावतीच्या तरुणांची माथी भडकवत आहेत. अमरावतीमधला सलोखा कायम राहिला पाहिजे. जनता यांना माफ करणार नाही..असं त्या म्हणाल्या.