‘आदित्य ठाकरेंचे लवकर शुभमंगल होवो आणि विदर्भातील सून असेल तर फारच चांगले होईल’

Mumbai – राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Environment Minister and Shiv Sena leader Aditya Thackeray) आज अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी राज्यातूनही हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल (Shiv Sainik arrives in Ayodhya) झाले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अयोध्या दौऱ्यावरुन भाजपाचे नवनिर्वाचीत खासदार अनिल बोंडे यांनी आदित्य ठाकरेंचे लवकर लग्न व्हावे अशी प्रार्थना केली आहे(Aditya Thackeray’s wedding) . एका पत्रकार परिषदेत बोलताना अनिल बोंडे यांनी याबाबत भाष्य केले आहे. प्रभू श्रीरामाचे ते दर्शन घेत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मी सिद्धीविनायकला जाऊन आलो त्यावेळी प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना केली की आदित्य ठाकरेंचे लवकर शुभमंगल होवो आणि सीतामाई सारखीच सुनबाई आम्हाला मिळो. ते माझ्या मुलाच्या वयाचे आहेत. विदर्भातील सून असेल तर फारच चांगले होईल, असे नवनिर्वाचीत खासदार अनिल बोंडे म्हणाले.