‘अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परब यांनी तयार राहावे’

मुंबई – शिवसेना नेते अनिल परब (Shiv Sena leader Anil Parab) यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे (Pune) आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली गेली आहे.

ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील (Marine Drive) सरकारी निवासस्थानी दाखल झाले होते. ईडीच्या या कारवाईमुळं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ईडीने अनिल परब यांच्यासंबंधित कोणत्या सात ठिकाणांवर धाड टाकली आहे.

दरम्यान, अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई सुरू करताच भाजपा नेते किरिट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी एक प्रतिक्रिया प्रसिद्ध केला आहे. ट्वीटरवर अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवाब मलिक (Nawab Malik) तुरुंगात आहेत, आता अनिल परब यांनी तयार राहावे, असं सोमय्या यांनी लिहिलं आहे.