अंकिता लोखंडेचे ८ बीएचकेचे आलिशान घर आहे खूपच सुंदर, बेडरुमपासून बाल्कनीपर्यंत सर्वकाही लग्जीरियस

Ankita Lokhande-Vicky Jain Luxury House: सिनेकलाकारांच्या पडद्यावरील आयुष्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांना खूप रस असतो. अभिनेता किंवा अभिनेत्रींचे खरे आयुष्यातील कुटुंब, त्यांचे घर कुठे आहे, कसे आहे, त्यांचे अफेअर्स, त्यांच्या आवडीनिवडीपासून प्रत्येक गोष्टीत चाहत्यांना रस असतो. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यातील एका गोष्टीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या आलिशान घराबद्दल या बातमीतून माहिती घेणार आहोत…

अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्नानंतर तिचा पती विकी जैन याच्यासोबत राहत आहे. अंकिता तिच्या पतीसोबत एका आलिशान फ्लॅटमध्ये राहत असून या फ्लॅटमध्ये 8 बीएचकेचा (बेडरूमच्या हॉलच्या किचनसह) आहे. अंकिताच्या किचनपासून बेडरूम-लिव्हिंग रूम-बाल्कनीपर्यंत एक गोष्ट कॉमन आहे. ते म्हणजे पांढरा रंग. अभिनेत्रीने तिचे घर पांढऱ्या रंगाने सजवले आहे. तिच्या बेडरूमच्या आतील भागापासून ते दिवाणखान्यापर्यंत सर्व काही शुभ्रतेने चमकत आहे.

असे सांगितले जाते की, हे घर बांधण्यासाठी जवळपास ३ वर्षे लागली होती. तसेच हे लक्झिरियस घर बनवण्यात त्यांना कोटींचा खर्च आला होता. अंकिता आणि विकी जैन हा आलिशान फ्लॅट मुंबईत असून त्यांनी २०२२ मध्ये या फ्लॅटमध्ये गृहप्रवेश केला होता. ती सातत्याने तिचे आणि पती विकी जैनसोबतचे घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.