अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही – पवार 

Annasaheb Patil Economic Backward Development Corporation – समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करण्याची सरकारची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातल्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

दरम्यान अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही अजित पवार यांनी दिली.नागपूर विधान भवनातील उपमुख्यमंत्री कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या लोगोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले.यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अतुल भातखळकर, प्रमोद हिंदुराव उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजाच्या उन्नत्तीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजना समाजाच्या गरजू लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करा. एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी घेण्याच्या सूचना सुद्धा दिल्या.

 

महत्वाच्या बातम्या-

हे ट्रिपल इंजिन सरकार नसून ट्रबल इंजिन सरकार; जयंत पाटील विधानसभेत गरजले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा;अशोक चव्हाण यांची मागणी

Barbeque Chicken Salad तुमच्या तोंडाला आणेल पाणी! रेसिपी नोट करुन घ्या

सरकारने प्रत्येक मोर्चाला तोंड दिले पाहिजे, कोणी ना कोणीतरी मंत्र्यांनी सामोरे जायला हवे – पाटील