Teacher Drinks Alcohol | धक्कादायक! आयुष्यात खूप टेंशन आहे म्हणत शिक्षकाने मुख्याध्यापिकेपुढेच ढोसली दारू, Video

Teacher Drinks Alcohol In School : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये एक व्यक्ती दारू पिताना दिसत आहे. वास्तविक, हा व्हिडिओ छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचा आहे. व्हायरल क्लिपमध्ये शिक्षक महिला शिक्षिकेसमोर पेग बनवनंतर दारू पिताना दिसत आहे. इतकंच नाही तर त्याच्या टेबलावर दारूसोबत (Teacher Drinks Alcohol) खाण्यासाठी चकनाही ठेवलेला दिसत आहे.

व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने जेव्हा शिक्षकाला प्रश्न विचारला की तुम्ही शाळेत कसे दारू पिऊ शकता? तेव्हा शिक्षक म्हणतो, व्हिडिओ व्यवस्थित बनवा, त्यात सर्वकाही दिसले पाहिजे, तुम्हाला तक्रार करायची असेल तर करा. यावर व्हिडिओ बनवणारा म्हणतो की, महिला मुख्याध्यापकांसमोर दारू पिणे योग्य नाही, तर शिक्षक प्रत्युत्तरात म्हणतो, मी घरीच पितो, आज चुकून दारू प्यायलो. शाळेत दारू पिणे चुकीचे आहे, पण काय करणार, आयुष्यात खूप टेन्शन आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

मात्र, शिक्षकाने दारू प्यायल्याने कोणीही आक्षेप घेतलेला दिसत नाही. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने जेव्हा महिला मुख्याध्यापकाला विचारले की हे शिक्षक दररोज दारूच्या नशेत येतात का?, तेव्हा त्यांनी सांगितले की तो दररोज नशेत येत नाही. मात्र, त्यांच्या अशा वागणुकीवर लवकरच कठोर कारवाई केली जाईल. हे प्रकरण जिल्हा शिक्षणाधिकारी टीआर साहू यांच्यापर्यंत पोहोचल्यावर चौकशीनंतर आरोपी शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Loksabha Election: भाजपकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

Rohit Pawar – फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

Pankaja Munde | पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? भाजपच्या ‘त्या’ यादीत आलं नाव