भाजपचे अनेक आमदार नाराज? एकनाथ खडसेंनी केलेल्या दाव्याने खळबळ 

Mumbai – राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे धक्के केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर सर्वच प्रमुख पक्षांना अजूनही बसत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एक मोठं विधान केलं आहे.

भाजपाचे अनेक आमदार नाराज असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला. तसेच भाजपा आमदार माझ्याशी बोलताना या निर्णयामुळे नाखूश असल्याचं सांगत असल्याचं खडसेंनी म्हटले आहे. भाजपा आमदार माझ्याशी बोलताना या निर्णयामुळे नाखूश असल्याचं मलाही सांगतात. त्यामुळे याचा परिणाम आज नाही, उद्या होईल, मात्र निश्चित होईल. तो परिणाम या पक्षांसाठी अनुकुल नसेल असा दावा एकनाथ खडसेंनी केला.

ज्यावेळी मंत्रीमंडळ विस्तार होईल, खातेवाटप होईल तेव्हा मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळणार आहे. आज भाजपाच्या आमदारांमध्येही नाराजी आहे. भाजपा आमदारांमध्ये नाराजी आहे, फक्त शिंदे गटाप्रमाणे बाहेर बोलत नाहीत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतल्याने भाजपाचे अनेक आमदार नाराजी व्यक्त करत आहेत,” असा दावा एकनाथ खडसेंनी केला.