Elvish Yadav: बिग बॉस विजेता एल्विश यादवला फोनद्वारे एक कोटींची खंडणी देण्याची धमकी

Elvish Yadav Extortion call: बिग बॉस ओटीटी 2 चा (Big Boss) विजेता एल्विश यादवबद्दल (Elvish Yadav) मोठी बातमी समोर आली आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत गुरुग्राम पोलिसांनी सोशल मीडिया इन्फुएन्सर एल्विश यादव याच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एल्विशने केला गुन्हा दाखल
25 ऑक्टोबर रोजी वजिराबाद गावाजवळ एका फोनद्वारे एल्विश यादवला एक कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. हा कॉल कोणी केला हे एल्विशला माहीत नाही. अशा परिस्थितीत त्याने गुरुग्रामच्या सेक्टर 53 पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात 358 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कोण आहे एल्विश यादव?
एल्विश यादव एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. बिग बॉस OTT 2 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून त्याने प्रवेश केला होता. पुढे तो या शोचा विजेताही ठरला. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एल्विशची प्रसिद्धी आणि फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढले आहे. त्याच्या ‘सिस्टीम’ची सर्वत्र चर्चा आहे. आता एल्विश यादवला गाण्यांपासून ते चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या झंझावाती विजयाने पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर जाण्याच्या मार्गावर ?

धक्कादायक ! ललित पाटीलला पुण्याबाहेर पळवण्यात ‘या’ व्यक्तीचा होता हात

इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारतासाठी चिंता वाढवणारी बातमी, हार्दिकच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट