दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडा; रामदास आठवले यांची मागणी

मुंबई – जत (Jat) हा दुष्काळी भाग आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी (Drought) भागात राज्य सरकार ने कृत्रिम पाऊस (Artificial rain) पाडण्याचा पर्यायावर विचार करावा. जत भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य मिटविण्यासाठी आवशयक म्हैसाळ प्रकल्पाच्या (Mahisal project) 6 व्या आणि 7 व्या टप्प्यासाठी राज्य सरकार नवं अद्याप निधी दिलेला नाही.त्यासाठी त्वरित निधी द्यावा या मागणीचे पत्र आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठविणार आहोत. येथील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रिपब्लिकन पक्ष (Republican party) शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Minister of State for Social Justice Ramdas Athavale) यांनी केले.

जत येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शेतकरी मेळावा (Farmers meet) आयोजित करण्यात आला होता.त्यात प्रमुख अतिथी म्हणून ना.रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रिपाइंचे राज्य सचिव विवेक कांबळे, संजय कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शेतकऱ्यांच्या हिता साठी 3 कृषी कायदे केले होते. मात्र शेतकरी आंदोलनामुळे ते कायदे त्यांनी रद्द केले. मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी;शेतकऱ्यांच्या पाठीशी मोदी सरकार उभे आहे असे रामदास आठवले म्हणाले.

दुष्काळ निवारण करण्यासाठी आणि महापूरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नदीजोड प्रकल्प (River confluence project) देशाला सुचविला. मात्र नदी जोड प्रकल्पावर काँग्रेस च्या काळात विचार करण्यात आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी नदीजोड प्रकल्पाची अंमलबजावणी करीत आहेत.महाराष्ट्राचे महाविकास आघाडी (MVA) सरकार मात्र नदी जोड प्रकल्प सुरू करीत नाही.महाविकास आघाडी माणसे जोडत नाही तर नदी कधी जोडणार असा टोला यावेळी रामदास आठवले यांनी राज्य सरकारला लगावला.