सकाळी ८ वाजता शपथविधी झाला, त्याला पहाटे कसं म्हणता येईल ?

सांगली – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा (Shivsainik) उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) ,बाबरी, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही नवाब मलिक (Nawab Malik), अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) मांडीला मांडी लावून सत्तेत बसला असता असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला. मात्र आता यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (ajit pawar) भाष्य करत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय. त्यावर काही बोलायचं नाही असं विधान केले आहे.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, सरकार येऊन अडीच वर्ष झाली, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मी मागेही सांगितले मला ज्यावेळी योग्य वाटेल तेव्हा मी बोलेन. मला आता सांगावं वाटत नाही. अजित पवार तोपर्यंत कधी बोलणार नाही. सरकार आले काम करतंय. सकाळी ८ वाजता शपथविधी झाला. त्याला पहाटे कसं म्हणता येईल. सरकार होऊन अडीच वर्ष झाले. आता काही बोलायचं नाही. योग्य वेळी बोलेन असं त्यांनी म्हटलं.