तुमच्या सोबतचा माणूस बाळासाहेबांचा अपमान करतो आता कोणाला जोडे माराल?

Mumbai – भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बाबरी मशीद (Babri Masjid) पाडण्यात शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता, असा दावा केला होता, यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन, प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर पाटील यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत सारवासारव केली मात्र आता पुन्हा ठाकरे गटाकडून पाटील आणि शिवसेनेला लक्ष्य करण्यात आले आहे.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी याबबत प्रतिक्रिया दिली आहे.अरविंद सावंत म्हणाले की, बाबरी मज्जिद पडली तेव्हा बाळासाहेबांचा काहीही संबंध नव्हता असे वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर तुमच्या सोबतचा माणूस बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा अपमान करतो, आता कोणाला जोडे माराल?

बाळासाहेबांची शिवसेना,आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतो असं म्हणता, तुमच्यासोबत चा माणूस चक्क बाळासाहेबांचा अपमान करतो, हिम्मत असेल आणि स्वाभिमान असेल तर राजीनामे द्यावे. लांडग्यानी वाघाचे कातडे पांघरले म्हणून तो वाघ होत नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.