सदावर्तेंच्या गाडीच्या तोडफोडीचे आरोप जरांगेंनी फेटाळून लावले; म्हणाले, मराठा समाजाला…

Gunratna Sadavarte : काही दिवसांपूर्वी वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना अटक करण्याची भाषा केली होती. यामुळे मराठा समाजात गुणरत्न सदावर्तेंबद्दल रोष होता. त्या रागातूनच गुरुवारी सकाळी काही आंदोलकांनी सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्याचा प्रकार घडला आहे. गुणरत्न सदावर्ते मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या १६ मजली इमारतीत राहतात. याठिकाणी हा प्रकार घडला.

पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मंगेश साबवे, वसंत बनसोडे, राजू सावे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte)यांनी यासाठी मनोज जरांगे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, सदावर्ते यांचे सर्व आरोप मनोज जरांगे यांनी फेटाळून लावले आहे. सदावर्ते यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही, मात्र, त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचे आम्ही समर्थन करणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत.

सदावर्ते यांच्या आरोपाला उत्तर देतांना जरांगे म्हणाले की, नेमकं काय झालं आहे, त्याबद्दल मला काहीच माहित नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. जर सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला झाला असेल, तर त्याचे आम्ही समर्थन करत नाही. तसेच, सदावर्ते यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. या हल्ल्यासाठी ते कोणाचे देखील नाव घेतील. उद्या ते देवेंद्र फडणवीस यांचे नाव देखील घेतील. आम्ही कसे उपोषण करावे याबद्दल त्यांनी सांगण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचे पाहावे. मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न सदावर्ते करतात. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, असे जरांगे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या झंझावाती विजयाने पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर जाण्याच्या मार्गावर ?

धक्कादायक ! ललित पाटीलला पुण्याबाहेर पळवण्यात ‘या’ व्यक्तीचा होता हात

इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारतासाठी चिंता वाढवणारी बातमी, हार्दिकच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट