विरोधी पक्ष संपवायचा लोकशाही ठेवायचीच नाही असे धोरण भाजपचे सुरू आहे- विकास लवांडे

Vikas Lawande – सध्या विरोधी पक्ष संपवण्याचे धोरण भारतीय जनता पार्टीने देशात आणि महाराष्ट्रात सुरू केले आहे. भारतीय जनता पार्टी विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींविरोधात तपास यंत्रणा लावण्यात येत आहे. मात्र ते व्यक्ती ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात त्यावेळी त्यांच्या विरोधातील करण्यात आलेले आरोप आणि सुरू असलेल्या चौकशी थांबवण्यात येतात असा आरोप शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केलाय.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ज्या लोकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहे. त्या लोकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांचा तपास थंड बसतात का? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आरोप केलेले अजित दादा मित्र मंडळ मधील हे सर्व लोक भारतीय जनता पार्टी सोबत गेल्यानंतर त्यांच्या विरोधातील केंद्रीय तपास यंत्रणेतील सुरू असलेली चौकशी बंद झाल्या आहे. भारतीय जनता पार्टी कडून केवळ तपास यंत्रणेची भीती दाखवून विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचं काम सध्या सुरू आहे तसेच विरोधी पक्ष संपवण्याचा देखील या माध्यमातून काम सुरू असल्याचं प्रवक्ते विकास लवांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

विकास लवांडे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस सत्तेत असते त्यावेळी विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांची कुठलीही दखल भाजपकडून घेतली जात नाही. विद्यमान मंत्री धनंजय मुंडे ज्यावेळी खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यावेळी २०१४ मध्ये धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यावेळी त्यांनी भाजपमधील २२ मंत्र्यांविरोधात विधानसभेमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या २२ भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करा या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहे. असे वारंवार सभागृहात आणि जाहीर सभेमधून धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. जर मी पुरावे देऊ शकलो नाही तर राज्यातील कुठल्याही चौकामध्ये मी फाशी घ्यायला तयार आहे असे धनंजय मुंडे म्हटले होते. आता सध्या धनंजय मुंडे भाजप सोबत अजित दादा मित्र मंडळाच्या मार्फत मंत्री देखील झालेले आहे. ज्या अजित दादा मंत्रिमंडळाच्या सदस्यांना ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या नोटीस आले आहे. हे सर्व आज अजित दादा मित्र मंडळात सोबत आहे. मग त्यावेळी धनंजय मुंडे खरे बोलले की खोटे बोलले हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्या २२ मंत्र्यांची राज्यातील ट्रिपल इंजन खोके सरकार आणि देशातील भाजप सरकार ईडी द्वारे चौकशी करणार का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप केला होता हा घोटाळा खरा होता की खोटा होता हे देशातील जनतेला सांगणार का असा प्रश्न विकास लवांडे यांनी विचारला आहे.

विकास लवांडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांना देखील ईडीची नोटीस आली आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये युवा संघर्ष यात्रा पुणे ते नागपूर काढण्यात आली होती. रोहित पवार यांची २०१२ मध्ये राज्य सहकारी बँकेचे प्रशासक यांनी हायकोर्टाच्या निदर्शनानुसार राज्यातील अनेक साखर कारखान्यांचा लिलाव केले होते. या साखर कारखान्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अण्णा हजारे यांनी केले होती. या सर्व कारखान्यांची चौकशी देवेंद्र फडणवीस हे २०१४ मध्ये मुख्यमंत्री असताना झालेली होती. या साखर कारखान्याची झालेल्या चौकशीचे अद्यापही काय झालं हे समोर आलेलं नाही आहे. मात्र आता १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांना केवळ ते शरद पवार यांच्या सोबत निष्ठेने उभे राहिले आणि संघर्षाची भूमिका त्यांनी घेतल्यामुळे त्यांची पुन्हा ईडीमार्फत चौकशी सुरू केली आहे का असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. मोहन भागवत यांनी राम मंदिर उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर म्हटले होते की आतापर्यंत ९ वर्षात रामराज्य आलेले नव्हते पण इथून पुढे तरी रामराज्य येईल अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. विरोधी पक्ष संपवायचा लोकशाही ठेवायचीच नाही असे धोरण भारतीय जनता पार्टीचे सुरू आहे असे विकास लवांडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

लज्जास्पद! शेजाऱ्याने मुलीला खोलीत बंद करून मारहाण केली, तिला वाचवायला गेलेल्या आईलाही सोडले नाही

एलॉन मस्कची लवकरच भारतात एन्ट्री, मिळणार परवाना; जिओ आणि एअरटेलशी थेट स्पर्धा

भारतरत्न प्राप्तकर्त्याला पदकासोबत किती पैसे मिळतात? याच्याशी संबंधित सर्वकाही जाणून घ्या