‘रोहित पवार ठरले आहेत करमाळा तालुक्यासाठी खलनायक’

करमाळा – विद्यमान आमदार संजय शिंदे अद्यापही राष्ट्रवादीत प्रवेश करत नाहीत याचा राग रोहित पवार यांच्या मनात असून आमदार संजय शिंदे यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी त्यांना आदिनाथ पाहिजे आहे. मात्र त्यांच्या या राजकारणात करमाळ्याच्या ऊस उत्पादक सभासद होरपळून निघत आहेत यामुळे खऱ्या अर्थाने आज रोहित पवार हे करमाळा तालुक्यातील जनतेचे खलनायक  ठरले आहेत असा आरोप देवानंद बागल यांनी केला आहे

ते म्हणाले, सत्तेचा गैरवापर करून केवळ 17 कोटी रुपयांची थकबाकी म्हणजेच एनपीए दाखवून आदिनाथ कारखाना लाटण्यासाठी शिखर बँक, राज्यातील सहकार खाते, त्यातील अधिकारी, दिल्लीतील एनसीडीसी बँक, व बागल गटाला ,हाताशी धरून कारखाना भाडेकराराने घेतला. गेली दोन वर्षापासून स्वतः कायदेशीर अडचण निर्माण करून आदिनाथ वर जास्तीत जास्त कर्ज व्याज वाढवायचे व कारखाना बंद पाडून शेतकरी अडचणीत आणायचे व आपणच तारणहार आहोत असा भास आमदार रोहित पवार आपल्या चमच्या मार्फत तालुक्यात निर्माण करत आहेत.

दोन वर्षापासून करार रखडल्यामुळे कारखान्यावर व्याजाची रक्कम 25 कोटींनी वाढली आहे तर दोन वर्षाचे जवळपास सोळा कोटी रुपये भाडे बुडले आहे शिवाय कारखाना सुरू न झाल्यामुळे आदिनाथ च्या उस उत्पादक सभासदांना ऊस तोडणी साठी प्रति एकरी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च करावे लागत आहेत तर अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस पेटवून दिला या सर्व पापाचे धनी रोहित पवार आहेत.

आदिनाथ कारखान्याचे 32 हजार सभासदांच्या शेअरच्या रकमेवर दरवर्षी ला लाभांश देणार का! दिवाळीला सभासदांना मोफत साखर देणार का!! आदिनाथ मधील सर्व कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार देऊन त्यांना पुन्हा कामात घेणार का!!! आदिनाथ वजन काटा सर्व सभासदांना तपासण्यासाठी उघडा ठेवणार का !!आदिनाथच्या सभासद ऊस उत्पादकांचा सर्व ऊस तोडण्यासाठी नेणार का!!! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंबालिका प्रमाणे ऊस उत्पादकांना दर देणार का !! या एकाही प्रश्नाचे उत्तर आमदार रोहित पवार यांनी आत्तापर्यंत दिले नाही.

स्वतः गप्प बसायचे व आपल्या दरबारातील गुलामांना बातम्या व प्रसिद्धी देण्याचे काम द्यायचे व मतदारात सभासदा मध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम रोहित पवार करत आहेत. करमाळा तालुक्यावर एवढे प्रेम असेल तर रोहित पवारांनी यावर्षी करमाळा तालुक्यात आदिनाथ कारखान्याच्या सभासद असलेल्या ऊस उत्पादकांचा सर्व ऊस गाळपाचे नियोजन का केले नाही. असं देखील बागल म्हणाले आहेत. दरम्यान, देवानंद बागल है माजी आमदार नारायण पाटील यांचे कट्टर समर्थक असून रश्मी बागल यांचे चुलते आहेत यामुळे देव आनंद बागल यांच्या प्रतिक्रियेला मोठे महत्त्व निर्माण झाले आहे