पक्षातील आपले कमी होत असल्याने कॉंग्रेसचा ‘हा’ झुंजार नेता ‘आप’ मध्ये प्रवेश करण्याची शक्यता

गांधीनगर – पंजाब जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाने यावेळी गुजरातमध्ये पूर्ण ताकद लावली आहे. यातच वर्षअखेरीस होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू असतानाच कॉंग्रेस पक्षाचे गुजरात प्रभारी रघू शर्मा यांनी कॉंग्रेस कार्याध्यक्ष राहुल गांधींना हार्दिक पटेल बाबत (Hardik Patel) अहवाल सादर केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अहवालानुसार हार्दिक आम आदमी पक्षात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, नरेश पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार सुरू असून लवकरच नरेश पटेल (Naresh Patel) यांचा पक्षात समावेश केला जाऊ शकतो, असा पुनरुच्चार सूत्रांनी केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आम्ही दोन आठवड्यांपूर्वी सांगितले होते की गुजरात निवडणुकीत काँग्रेस खोडलधाम ट्रस्टचे नरेश पटेल यांना चेहरा बनवू शकते. प्रशांत किशोर (Prashant Kishor) देखील या रणनीतीचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र याच दरम्यान हार्दिक पटेलने बंडखोरी भूमिका दाखवून पक्षाची चिंता वाढवली आहे. नरेश पटेल यांच्याबाबतच्या निर्णयाला झालेल्या दिरंगाईवर हार्दिक नाराजी व्यक्त करत असला, तरी पक्षातील आपले कमी होत चाललेले महत्त्व यामुळे नाराज असल्याचे मानले जात आहे

हार्दिक पटेल यांनी तर यापूर्वीही म्हटले आहे की, कार्याध्यक्षाला काही काम नसते, हे लग्नानंतर नसबंदी करून घेण्यासारखे आहे! हार्दिक पटेलच्या ताज्या भूमिकेवर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट म्हणाल्या की, ते काँग्रेसचे नेते आहेत आणि निवडणुकीत व्यस्त आहेत, त्यांनी त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे.