…म्हणून अशोक सराफ यांनी अभिनय करु नये असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं

Ashok Saraf: ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे.

अशोक सराफ यांनी चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अशोक सराफ हे त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. अशातच आता  अशोक सराफ  यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर झाल्यानंतर आता त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अशोक सराफ यांच्या अभिनयाला त्यांच्या वडिलांनी (Ashok saraf Father) सुरुवातीला विरोध केला होता. त्यांनी नीट शिकावं आणि मग एखादी चांगली नोकरी करावी असं अशोक सराफ यांच्या वडिलांना वाटत होतं. ज्यानंतर अशोक सराफ बँकेत काम करत होते. पण नाटक काही सुटलं नाही. त्यानंतर अशोक सराफ यांना जशी बक्षीसं मिळू लागली तसा त्यांच्या वडिलांचा विरोध मावळला. त्यांच्या लक्षात आलं की खूप चांगला अभिनय आपला मुलगा करतो आहे. त्यामुळे त्यांनी नंतर विरोध केला नाही.

महत्वाच्या बातम्या-

आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न : नाना पटोले

देवाभाऊंची कमाल! एकाच दिवशी 3,16,300 कोटींचे सामंजस्य करार; 83,900 लोकांना मिळणार रोजगार

ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायतही जिंकू शकत नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल