Ashutosh Sharma | “एकवेळच्या जेवणासाठीही पैसे नव्हते”, संघर्षाचे दिवस आठवून आशुतोष भावूक झाला

Ashutosh Sharma | पंजाब किंग्जचा फलंदाज आशुतोष शर्माने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्पा उघड करताना सांगितले की, एक वेळ अशी होती की जेव्हा त्याच्याकडे अन्न विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते. या २५ वर्षीय क्रिकेटपटूने गुजरात टायटन्सविरुद्ध १७ चेंडूंत ३१ धावांची उपयुक्त खेळी खेळून पंजाब संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेल्वेकडून खेळतो.

‘जेवणासाठीही पैसे नव्हते’
मध्य प्रदेशातील रतलाम येथे जन्मलेल्या आशुतोषने आपल्या संघर्षाचे दिवस आठवत सांगितले की, तो काळ खूप कठीण होता कारण मला इंदूरमध्ये घरापासून दूर राहावे लागले. माझ्याकडे अन्न विकत घेण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून मी एका वेळच्या जेवणासाठी पंचगिरी करत असे. मी एका छोट्याशा घरात राहत होतो, पण एमपीसीए अकादमीने मला खूप मदत केली.

त्याचवेळी आशुतोषची (Ashutosh Sharma) आई हेमलता शर्मा यांनी सांगितले की, आशुतोषचे वडील (रामबाबू शर्मा) रतलामच्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये काम करतात. आम्ही आर्थिक संघर्ष केला नाही, पण आशुतोषला लहानपणापासूनच स्वतःचा संघर्ष होता. रेल्वेत रुजू झाल्यावर त्यांचा तारा चमकला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | आम्हाला पडणारं मतदान निश्चित आहे; मोहोळांबाबत धीरज घाटेंनी व्यक्त केला विश्वास

Shirur LokSabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात कुणाचे पारडे जड? राजकीय गणितं काय ?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘बूथ विजय अभियान’, प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार