Pat Cummins | मला त्याला गोलंदाजी करायची नाही’, कोणत्या फलंदाजाला घाबरला विश्वविजेता गोलंदाज पॅट कमिन्स?

Pat Cummins | आयपीएल 2024 च्या 18 व्या सामन्यात शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा 11 चेंडू शिल्लक असताना 6 गडी राखून पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादने विजयी मार्गावर जोरदार पुनरागमन केले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने 18.1 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले.

एडन मार्कराम (50) आणि अभिषेक शर्मा (37) यांनी हैदराबादला सहज विजय मिळवून देण्यात विशेष भूमिका बजावली. पॅट कमिन्सने सामन्यानंतर अभिषेक शर्माचे कौतुक केले आणि त्याला गोलंदाजी करायला आपल्याला आवडणार नाही असेही सांगितले. अभिषेक शर्माने केवळ 12 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 300 पेक्षा जास्त होता.

पॅट कमिन्स (Pat Cummins) काय म्हणाला?
सामन्याबद्दल बोलताना विश्वविजेता कर्णधार कमिन्स म्हणाला, वेगवेगळी माती होती, खेळपट्टी जसजशी मॅच पुढे सरकत होती तसतशी मंद होत होती. तरीही एक उत्तम सामना. आमच्याकडे अनेक वेगवान गोलंदाज आहेत. शिवम दुबे फिरकीपटूंविरुद्ध चांगली फटकेबाजी करत होता. मग आम्ही वेगवान गोलंदाजांसोबत त्याला बाद करण्याची योजना आखली. वेगवान गोलंदाजांनी कटरचा चांगला वापर केला.

अभिषेक शर्माने उत्कृष्ट फलंदाजी केली. मला त्याच्याविरोधात गोलंदाजी करायला आवडणार नाही. प्रेक्षकांचा भरभरून पाठिंबा मिळाला. एमएस धोनी फलंदाजीसाठी क्रीझवर आल्यावर प्रेक्षकांचा आवाज आणखीनच मोठा झाला. आम्हाला इथे खेळायला आवडते. ही आमची देशांतर्गत परिस्थिती आहे, असे कमिन्स म्हणाला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | आम्हाला पडणारं मतदान निश्चित आहे; मोहोळांबाबत धीरज घाटेंनी व्यक्त केला विश्वास

Shirur LokSabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात कुणाचे पारडे जड? राजकीय गणितं काय ?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘बूथ विजय अभियान’, प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार