Asia Cup 2023: एशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा; पहा नेमकी कुणाला मिळाली संधी

आशियाई क्रिकेटची महान लढाई म्हणजेच आशिया कप (Asia Cup) 30 ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India For Asia Cup) केली आहे. BCCI ने 2023 आशिया चषक स्पर्धेसाठी नुकताच 17 सदस्यीय संघ निवडला आहे.

लेग-स्पिनर युझवेंद्र चहल, यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांचा 2023 आशिया चषक स्पर्धेसाठी भारताच्या 17 सदस्यीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, सॅमसन बॅकअप यष्टिरक्षक म्हणून संघाशी जोडला जाईल.

विकेटकीपर फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात परतले आहेत. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीशी झुंजत होते. मात्र आता दोन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. आयपीएल २०२३ च्या हंगामात केएल राहुल शेवटचा मैदानावर दिसला होता. केएल राहुलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दुखापत झाली होती. त्यानंतर तो संपूर्ण स्पर्धेत खेळू शकला नाही. मात्र, केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाची मधली फळी खूपच मजबूत दिसत आहे.

2023 आशिया कप 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. त्याचबरोबर टीम इंडिया 2023 आशिया कपमध्ये 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्याचबरोबर आशिया चषकाचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला होणार आहे.

2023 आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा 17 सदस्यीय संघ (Indian Squad For Asia Cup) – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (राखीव यष्टिरक्षक), रविंद्र पंडय्या, रविंद्र पंडय्या , अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.