मागील सामन्यात गचाळ कामगिरी करणाऱ्या ‘या’ गोलंदाजाला मिळणार डच्चू ?

नागपूर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध मंगळवारी झालेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाच्या एका खेळाडूला तीन वर्षांनंतर भारताकडून T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, पण त्याने ही सुवर्णसंधी वाया घालवली. आता या खेळाडूला भारताच्या T20 आंतरराष्ट्रीय संघातून कायमचे बाहेर व्हावे लागेल अशी शक्यता आहे, कारण कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून नक्कीच वगळेल असं दिसतंय.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार, 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणार आहे. पहिला टी-२० सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत दुसरा टी-२० सामना भारतासाठी ‘करा किंवा मरो’ असा असेल. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप गोलंदाज उमेश यादवला (Umesh Yadav) दुसऱ्या टी-२० सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळेल असं दिसतंय.

उमेश यादव 2019 नंतर प्रथमच भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कांगारू फलंदाजांनी उमेश यादवला धोपटून काढले. उमेश यादवने 2 षटकात 27 धावा दिल्या. या दरम्यान उमेश यादवने दोन गडी बाद करत आपली इज्जत कशीतरी वाचवली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात उमेश यादवला प्लेइंग इलेव्हनमधून वगळून कर्णधार रोहित शर्मा आपला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला संधी देवू शकतो. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुसरा टी-२० सामना खेळला तर तो कांगारू फलंदाजांसाठी काळ ठरेल अशी शक्यता आहे.