ऐतिहासिक! भारताच्या महिला कबड्डी संघाने जिंकले सुवर्णपदक, मेडल्सची शंभरीही झाली पूर्ण

India In Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच 100 पदकांचा आकडा पार केला आहे. भारतीय महिला कबड्डी संघाने (Indian Women’s Kabaddi Team) तैवानचा पराभव करून भारताला 100 वे पदक मिळवून दिले. यामध्ये 25 सुवर्णपदकांचाही समावेश आहे. याशिवाय भारताने आतापर्यंत 35 रौप्य आणि 40 कांस्यपदके जिंकली आहेत. महिला संघाने रोमहर्षक अंतिम सामन्यात तैवानचा 26-25 असा पराभव केला. आज पुरुष कबड्डी संघातही सुवर्णपदकासाठी स्पर्धा होणार आहे. याशिवाय पुरुष क्रिकेटमध्येही सुवर्ण सामन्यात अफगाणिस्तानचा सामना होणार आहे. याआधी महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावले आहे.

भारतीय महिला कबड्डी संघाने अंतिम फेरीत तैवानविरुद्ध शानदार सुरुवात केली. अर्ध्या वेळेपर्यंत भारतीय संघ 14-9 ने पुढे होता. त्यांनी उत्तरार्धातही चांगली कामगिरी करत सामना 26-25 असा जिंकून सुवर्णपदक पटकावले. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांमध्ये रंजक सामना रंगला. भारताने आतापर्यंत 9 खेळांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकले आहे. शूटिंगमध्ये सर्वाधिक 7 सुवर्णपदके जिंकली आहेत. याशिवाय अॅथलेटिक्समध्ये 6 सुवर्ण आणि तिरंदाजीमध्ये 5 सुवर्णपदके आली आहेत. स्क्वॉशमध्ये 2 सुवर्ण मिळवले. याशिवाय टेनिस, घोडेस्वारी, क्रिकेट, कबड्डी आणि हॉकीमध्ये प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकावले आहे.

शुक्रवारपर्यंत भारताने 95 पदके जिंकली होती. शनिवारी तिरंदाजीत पहिली 4 पदके आली. सुरेश वेण्णम आणि ओजस देवतळे यांनी सुवर्णपदक पटकावले. याशिवाय अभिषेक वर्माने रौप्य आणि अदिती स्वामीने कांस्यपदक जिंकले. यापूर्वी, 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सर्वाधिक 70 पदके जिंकली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 29 पदके अॅथलेटिक्समध्ये आली आहेत. याशिवाय भारतीय नेमबाजांनी 22 पदके जिंकली. तिरंदाजी संघालाही 9 पदके जिंकण्यात यश आले.

ज्योती सुरेखा वेण्णम आणि ओजस देवतळे यांनी सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक केली तर आदिती स्वामीला कांस्यपदक मिळाले. तिरंदाजी संघाने एकूण 9 पदके जिंकली. यापूर्वी 2014 मध्ये इंचॉन येथे झालेल्या खेळांमध्ये भारताने 3 पदके जिंकली होती. सुवर्ण जिंकल्यानंतर ज्योती म्हणाली, माझ्याकडे शब्द नाहीत. त्यामुळे अनेक भावना वाढत आहेत. मला विचार करायला वेळ लागेल. गुरु आणि शिष्य यांच्यातील सामन्यात 21 वर्षीय विश्वविजेत्या देवतळेने 34 वर्षीय अभिषेक वर्माचा 149-147असा पराभव केला.

महत्वाच्या बातम्या-
Goregaon Fire : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गोरेगावच्या आग दुर्घटनेतील जखमींची विचारपूस

ज्यांनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्लं त्यांना आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा काय अधिकार? – Chandrasekhar Bawankule