वयाच्या 46 व्या वर्षी प्रीती झिंटा झाली जुळ्या मुलांची आई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाच्या घरातून आंनदाची बातमी समोर आली आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी प्रीती जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रीतीने सोशल मीडियावरुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

याशिवाय अभिनेत्रीने आपल्या दोन्ही मुलांच्या नावाची घोषणा केली आहे. प्रीतीने मुलाचे नाव जय जिंटा गुडइनफ आणि मुलीचे नाव जिया जिंटा गुडइनफ असे ठेवले आहे. अभिनेत्रीने सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

पोस्ट शेअर करताना प्रितीने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘सर्वांना नमस्कार, मला तुमच्या सर्वांसोबत एक चांगली बातमी शेअर करायची आहे. जीन आणि मी खूप आनंदी आहोत आणि आज आम्ही आमच्या कुटुंबात जय झिंटा गुडनफ आणि जिया झिंटा गुडनफ या जुळ्या मुलांचे स्वागत करत आहोत. आमचं अंतःकरण कृतज्ञतेने भरलं आहे.