“शरद पवार यांच्यासारखे ५०० लोक…”, पडळकरांची खोचक टीका

Gopichand Padalkar On Sharad Pawar: भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करताना त्यांना ‘लांडग्याचं पिल्लू’ असं म्हटलं आहे. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर देताना शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

राजकीय दृष्टीकोणातून शरद पवार पवार भाजपाचे बाप आहे. भाजपा कुटुंब आणि पक्ष फोडण्यासाठी जबाबदार आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. याला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर देत शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. शरद पवार यांच्यासारखे ५०० लोक भाजपात आहेत, असं टीकास्र पडळकर यांनी सोडलं आहे.

“रोहित पवारांना माहिती नाही की, शरद पवार यांच्यासारखे ५०० लोक भाजपात आहेत. ते कोणत्या कोपऱ्यात बसतील? हे सुद्धा कळणार नाहीत. महाराष्ट्रात चालत असल्याने रोहित पवार बोलत राहतात. लोकांना भावनिक करण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रवादीचा हा शेवटचा मार्ग आहे.” अशा शब्दांत पडळकरांनी टीका केली आहे.