Hardik Pandya | ‘आम्ही लढत राहू…’, पराभवाच्या हॅट्रिकनंतर कर्णधार हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया चर्चेत

Hardik Pandya | हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये पहिल्यांदा गुजरात टायटन्सचा कर्णधार होता, तेव्हा त्याच्यासाठी सर्व काही ठीक चालले होते, पण मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर मात्र तसे राहिले नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने गमावले आहेत. ही केवळ सुरुवात असली तरी हा पराभव संपूर्ण संघ आणि त्यांच्या चाहत्यांना दुखावणारा आहे. दरम्यान, मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली आहे.

रोहितला हटवून हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
यावेळी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कर्णधार रोहित शर्माच्या जागी ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ज्याने गेल्या दहा वर्षांत मुंबई इंडियन्ससाठी 5 आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत. हार्दिक पांड्या याआधी फक्त मुंबई इंडियन्सकडून खेळला असला तरी तो दोन वर्षांसाठी संघ सोडून गुजरात टायटन्सची जबाबदारी सांभाळत होता. पण आता तो कर्णधार म्हणून एमआयमध्ये परतला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून त्याने दोन वर्षे जे यश मिळवले होते, तशाच प्रकारची कामगिरी यावेळी तो मुंबई इंडियन्ससाठी करेल, अशी अपेक्षा होती, पण घडले नेमके उलटे.

हार्दिकने गुजरातसाठी पहिले तीन सामने जिंकले होते
2022 मध्ये, जेव्हा हार्दिक पहिल्यांदा गुजरात टायटन्सचा कर्णधार बनला, तेव्हा पहिल्या तीनपैकी तीन सामने जिंकून तो सर्वात मोठा स्टार म्हणून उदयास आला. मात्र यावेळी त्याला मुंबईचा कर्णधार असताना तीनपैकी तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. पहिले दोन सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानावर हरले आणि आता मुंबईतील वानखेडेवरही असेच चित्र दिसले. दरम्यान, आता हार्दिक पांड्याने X वर एक पोस्ट केली आहे, ज्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. हार्दिकने लिहिले आहे की, या संघाबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे, ती म्हणजे आम्ही कधीही हार मानणार नाही. आम्ही लढत राहू, लढत राहू. तो त्याच्या टीम मुंबई इंडियन्सबद्दल बोलत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका