या देशाचे राष्ट्रपिता एकच, ते म्हणजे महात्मा गांधी! इतर कुणाची ती पात्रता नाही! – नाना पटोले

नागपूर| महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांची रोखठोक विधाने नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी केली. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमृता फडणवीस यांच्या विधानावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूर येथील एका कार्यक्रमादरम्यान मुलाखतदारांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा राष्ट्रपिता असा उल्लेख केला. “आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत,” असं विधान त्यांनी केलं.

यावर प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी एक ट्वीट केलं. “या देशाचे राष्ट्रपिता एकच आहेत आणि ते म्हणजे महात्मा गांधी! इतर कुणाची ती पात्रता नाही!,” असा घणाघात त्यांनी ट्वीटद्वारे केला.