‘हा राष्ट्रवादी पक्ष आहे की मुस्लीम लीग? शरद पवार यांना जिना बनण्याचे वेध लागलेले दिसतायत’

मुंबई – सुरूवातील कर्नाटकात सुरू झालेल्या हिजाबचा (Hijab) वाद सध्या महाराष्ट्रभर पसरला आहे. अल्पसंख्यांक समाजाचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणारे पक्ष आणि महाराष्ट्रातील काही मुस्लिम महिलाही हिजाबवरून चांगल्याचा आक्रमक झाल्या आहेत. नुकतेच पुण्यात, बीडमध्ये आणि मालेगावात पोलिसांचा विरोध झुगारून आंदोलनं आणि मेळावे भरवण्यात आले.

दरम्यान, देशभरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणी याला दडपशाहीचं नाव देतंय तर कोणी धर्माचं. मालेगावात हिजाबसाठी हजारो मुस्लिम महिला एकवटल्याचे पहायला मिळाले. पोलिसांचा विरोध झुगारून कल्लू स्टेडियम वर हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती दिसून आली.

या पार्श्वभूमीवर कथित पुरोगामी हे आता हिजाबचे समर्थन करताना दिसून येत आहेत तर अनेक विवेकवादी मंडळींनी शाळेत फक्त गणवेश घालूनच विद्यार्थ्यांनी यावे अशी मागणी केली आहे. दरम्यान, बीडमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ रॅली काढून हिंदू महिलांना हिजाब घालण्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतला होता हाच धागा पकडत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी आणि खा. शरद पवार यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, हा राष्ट्रवादी पक्ष आहे की मुस्लीम लीग? शरद पवार यांना जिना बनण्याचे वेध लागलेले दिसतायत असं त्यांनी म्हटले आहे.