औरंगाबादनंतर दिल्लीतील ‘औरंगजेब लेन’चे नाव बदलले, नवीन नाव काय आहे?

काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने ‘औरंगाबाद’ जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) असे केले. आता नवी दिल्ली नगरपालिका परिषदेने देखील औरंगजेबाच्या नावाने सुरू असलेल्या रोडचे नाव बदलले आहे. लुटियन्स दिल्लीतील औरंगजेब लेनचे (Aurangzeb Lane) नाव डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन (Dr. APJ Abdul Kalam Lane) असे करण्यात आले आहे.

नवी दिल्ली नगरपालिका परिषदेच्या (NDMC) अधिकाऱ्यांनी आपल्या बैठकीत या रस्त्याचे नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. खरं तर NDMC ने ऑगस्ट 2015 मध्ये औरंगजेब लेनचे डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता.