अमेरिकेत चक्रीवादळाचा कहर; पाच राज्यांनी घोषित केली आणीबाणी

न्यूयॉर्क – अमेरिकेत पूर्व किनारपट्टीच्या भागात जोरदार बर्फवृष्टी तसंच चक्रीवादळामुळं पाच राज्यांनी आणीबाणी घोषित केली आहे. न्यूयॉर्क, न्यू जर्सी, मेरीलँड, रोड आयलँड आणि व्हर्जिनिया या पाच राज्यांमध्ये आतापर्यंत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

तज्ञांच्या मते, या वादळातून बॉम्बोजेनेसिस परिस्थिती निर्माण होईल. ‘बॉम्बोजेनेसिस’ या शब्दाला वैज्ञानिक संदर्भ आहे. या परिस्थितीमध्ये थंड हवा समुद्राच्या उबदार हवेत मिसळल्यामुळं वातावरणाचा दाब कमी होऊन निर्माण झालेल्या चक्रीवादळाला बॉम्ब सायक्लोन असं संबोधित केलं जातं.

‘मध्य-अटलांटिक ते न्यू इंग्लंड पर्यंत सुमारे 40 दशलक्ष लोकांना या शक्तिशाली नॉर्’इस्टर वादळामुळं हिवाळ्यातील अतितीव्र हवामानाच्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.