Video: लॉर्ड्सवर हायव्होल्टेज ड्रामा, बेयरस्टोने बजरंगबलीप्रमाणे ताकद दाखवत आंदोलकाला उचलून नेले बाहेर

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (England vs Australia) यांच्यातील अॅशेस मालिकेतील (ashesh Series) दुसऱ्या कसोटी सामन्यात काही आंदोलकांनी मैदानात घुसून गोंधळ घातला. खेळ सुरू होण्याच्या दुसऱ्याच षटकात ही घटना घडल्याने गोंधळ उडाला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा फलंदाजी करत होते.

मैदानात घुसलेले आंदोलक जस्ट स्टॉप ऑइल यूके या पर्यावरण समूहाशी संलग्न आहेत. ब्रिटीश सरकारला नवीन तेल परवाने देण्यापासून रोखणे हे त्यांचे ध्येय आहे. या गटाची स्थापना फेब्रुवारी 2022 मध्ये झाली आणि एप्रिल 2022 मध्ये इंग्रजी तेल टर्मिनल्सवर निषेध सुरू झाला.

या आंदोलनकर्त्यांमुळे खेळ थांबल्याने चिडलेल्या इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) आंदोलकाला हाताने उचलून बाहेर फेकले. यादरम्यान त्याचे कपडे घाण झाले त्यामुळे त्याला पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये जावे लागले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.