आर्किटेक्ट जी.के.कान्हेरे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर सतीश मराठे यांना जीवनगौरव प्रदान

पुणे : ‘आर्किटेक्ट, इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ कडून दरवर्षी दिले जाणारे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ आर्किटेक्ट प्रा.जी.के.कान्हेरे, ज्येष्ठ स्ट्रक्चरल इंजिनियर सतीश मराठे यांना आज शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.

दि. १३ जानेवारी रोजी पी वाय सी हिंदू जिमखाना टेरेस येथे सायंकाळी ६ वाजता आर.बी.सूर्यवंशी(सिनियर चीफ एक्झिक्युटिव्ह ,बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा.लि.) आणि जे.पी.श्रॉफ(अध्यक्ष,श्रॉफ ग्रुप) यांच्या हस्ते या जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रत्येकी एक ज्येष्ठ आर्किटेक्ट आणि एक ज्येष्ठ इंजिनियर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान केला जातो.या पुरस्कारांचे हे १७ वे वर्ष होते. ‘सॉलिटेयर ‘ ग्रुपच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

असोसिएशन तर्फे प्रेसिडेंट पराग लकडे, उपाध्यक्ष राजीव राजे,चेअरमन महेश बांगड,सचिव संजय तासगांवकर यांनी सर्वांचे स्वागत केले.विश्वास कुलकर्णी, दिवाकर निमकर, केशव देसाई पुष्कर कानविंदे, शेखर गरुड आदि उपस्थित होते. महेश बांगड यांनी सूत्र संचालन केले. राजीव राजे यांनी आभार मानले.

आर बी सूर्यवंशी म्हणाले,’ आपल्या क्षेत्रांतील ज्येष्ठांचा सन्मान करणे ही परंपरा उल्लेखनीय असून बांधकाम क्षेत्रातून सर्वांचे जीवनमान उंचावण्याच्या कार्याचा सन्मान आहे.

सत्काराला उत्तर देताना जी. के. कान्हेरे म्हणाले,’ अभियांत्रिकी आणि आर्किटेक्ट कडे ओढा कमी होतो आहे. पारंपरिक संकल्पनांच्या जागी अभियंते आणि आर्किटेक्ट यांनी शहरे, समाज आणि इमारतींसाठी नव्या व्यवस्था निर्माण केल्या आहेत.आर्टिफिशयल इंटेलिजन्स चे युग आले असले तरी नावीन्य पूर्ण कल्पना आणि विचार यांचे महत्व कायम राहील. व्यवसाय, उत्पादन आणि सेवा बदलत राहिल्या तरी हे महत्त्व बदलणार नाही. यापुढे आंतरशाखीय शिक्षणाला महत्त्व राहील. त्यातून ‘डिझाईन थिंकर’ उदयास यावेत.

सतीश मराठे म्हणाले, ‘ शैक्षणीक आणि कारकिर्दीची प्रगतीकडे लक्ष देताना मुल्ये जपली पाहिजेत. चारित्र्य शिक्षण सर्व क्षेत्रात उपयोगी आहे. त्याकडेही लक्ष द्यायला हवे’.

जे. पी. श्रॉफ म्हणाले,’ आर्किटेक्ट आणि अभियंत्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून समाजोपयोगी नव निर्मिती करावी. देण्याची वृत्ती ठेवल्यास समाधान, यश मिळत राहते’.

‘आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’:५४ वर्षांची परंपरा

‘आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ ही ५४ वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. बांधकाम क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आणि नीतिमान सेवांना उत्तेजन देणे हा या संस्थेचा उद्देश आहे. पुण्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देऊन नागरी,सामाजिक प्रश्नांवर कार्यरत राहण्यासाठी ही संस्था स्थापन झाली.सभासदांची वर्गणी आणि प्रायोजकत्वातून विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये चर्चासत्रे,प्रशिक्षण ,विविध पुरस्कारांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

राजेंद्र प्रसाद यांना सोमनाथ मंदिराच्या उद्घाटन समारंभाला जाऊ नका असं का म्हणाले होते नेहरू?

3 पेक्षा जास्त मुले असल्यास महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही; सरकारचा मोठा निर्णय

राम मंदिराबाबत लालकृष्ण अडवाणींचे महत्त्वाचे विधान, ‘नियतीने ठरवले होते…’