Onion Price Hike: टोमॅटोनंतर आता कांदा महागणार? सप्टेंबरमध्ये भाव 60-70 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात

Onion Price Hike: कमी पुरवठ्यामुळे या महिन्याच्या अखेरीस किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता असून पुढील महिन्यात ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, ऑक्‍टोबरपासून खरीपाची आवक सुरू झाल्यावर कांद्याचा पुरवठा चांगला होईल, त्यामुळे भावात घसरण होण्याची अपेक्षा आहे.

क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्सच्या अहवालानुसार मागणी-पुरवठा असमतोलाचा परिणाम ऑगस्टच्या अखेरीस कांद्याच्या किमतीवर दिसून येईल अशी अपेक्षा आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून किरकोळ बाजारात भावात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे आणि ते 60-70 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते. तथापि, किंमत 2020 च्या उच्चांकाच्या खाली राहील.

ऑक्टोबरपासून खरीपाची आवक सुरू होईल तेव्हा कांद्याचा पुरवठा चांगला होईल, त्यामुळे भावात घसरण होईल, असे या अहवालात म्हटले आहे. सणासुदीच्या महिन्यांत (ऑक्टोबर-डिसेंबर) भावातील चढ-उतार दूर होतील, असे सांगण्यात आले आहे.