चुकीचा इतिहास तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आम्ही घडू देणार नाही –  आव्हाड

 मुंबई  – राजकीय पुढाऱ्यांनी समाजातील महागाई, गरिबी, रोजगार, शेतकऱ्यांबद्दल (About inflation, poverty, employment, farmers) बोलले पाहिजे. पण काही नेते हे विषय सोडून विनाकारण चुकीचा इतिहास सांगून तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न आम्ही कधी यशस्वी होऊ देणार असा स्पष्ट इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awhad) यांनी दिला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रदेश कार्यालयात जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या   आरोपांचा जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिवाद केला. तुम्हाला भोंग्यावर (On Loudspeaker) बोलायचं असेल तर बोला, पण इतिहासाला हात घालू नका, असे थेट आव्हानही जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या  (Chhatrapati Shivaji Maharaj) समाधीवरुन राज ठाकरे यांनी वाद सुरु केला यावर जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देऊन महाराजांची समाधी ही छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली असल्याचे सांगितले. १८६९ साली महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Fule)  यांनी रायगडावर जाऊन समाधीस्थळी स्वच्छता केली. त्याची बातमी नारायण मेघजी लोखंडे यांनी दीनबंधू वर्तमानपत्रात (Deenbandhu Newspaper) छापून आणली होती. फुलेंचा पत्रव्यवहार, शाहू महाराजांचा पत्रव्यवहार आजही आर्काईजमध्ये उपलब्ध आहे. फुलेंनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पहिली सभा घेतली होती, त्या सभेला करवीर संस्थानचे प्रमुख आबासाहेब घाटगे (Aabasaheb Ghatage) उपस्थित होते. आबासाहेबांनी त्यांचे अभियंते रायगडावर पाठवले देखील होते. मात्र सहा महिन्यातच त्यांचे निधन झाले. कालांतराने महात्मा फुलेंचेही निधन झाल्यामुळे ही मोहीम थांबली.

त्यानंतर १८९५ साली टिळकांनी हे काम हाती घेतले, त्यावेळचे सर्व संस्थानिकांना त्यांनी सोबत घेतले. लोकमान्य टिळक (Lokmany Tilak) हे फक्त दोन वेळा रायगड किल्ल्यावर गेले होते, असे इतिहासात नमूद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र नसल्यामुळे त्यांनी नाना फडणवीसांचे (Nna Fadnavis) छायाचित्र सिंहासनावर ठेवल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. १९२० साली टिळकांचे निधन झाले, तोपर्यंत समाधीसाठी काहीही काम झाले नव्हते. त्यांनी समाधी जीर्णोद्धार समिती स्थापन केली होती, त्यासाठी निधी गोळा केला होता. मात्र तो निधी ज्या बँकेत ठेवला होता, ती बँक बुडाल्याचे सांगितले गेले. समाधी जीर्णोद्धार समिती काम करत नसल्यामुळे १९२६ साली ब्रिटिशांनी समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम स्वतःकडे घेतले. या इतिहासावर मी कुणाशीही चर्चा करण्यासाठी तयार आहे. वर्तमान इतिहासकारांनाही हे संदर्भ माहीत आहेत. इतिहास असा कुणाच्याही नावावर खपवता येत नाही. चुकीचा इतिहास सांगूनच आमचे वाटोळे केले, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

भारतात ज्यांनी खरोखर इतिहास लिहिला त्यांची खूप मोठी परंपरा आहे. अनेक ब्राह्मण लेखकांनी इतिहास लिहिला आहे, त्यावर आमचा आक्षेप नाही. पण पुरंदरेंनी (Babasaheb Purandare) इतिहास नाही, तर कांदबरी लिहिली आहे. कांदबरी इतिहास नसते. इतिहास हा जातीचा, धर्माचा नसतो, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

पुरंदरे यांच्या जातीवरुन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी आदरणीय पवारसाहेबांनी (Sharad Pawar) कधीही जातीभेद केला नाही. कुसुमाग्रज यांच्या नावावरुन दिला जाणारा पुरस्कार सुरु करण्यासाठी पवारसाहेबांनी पुढाकार घेतला होता. विरोधी पक्षात असतानाही पवारसाहेबांना अनेक साहित्य समेंलनाचे उद्घाटक म्हणून साहित्यिकांनी बोलावले होते. मग हे सर्व साहित्यिक विकले गेले होते का ? असेही आता ते बोलतील. एस.एम. जोशीपासून (S.M. Joshi) अनेक ब्राह्मण नेत्यांसोबत पवारसाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पण मुद्दामहून अपप्रचार करुन महाराष्ट्र पेटवण्याचे कारस्थान काही लोक करत आहेत, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.

पुरंदरेंच्या साहित्याला ज्ञानपीठ का नाही मिळाला ? किंवा ऐतिहासिक लिखाणाबद्दल त्यांना एकाही विद्यापीठाने डॉक्टरेट का नाही दिली ? असे प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले. तरुणांमध्ये चुकीचा इतिहास जात आहे. राज ठाकरे आदरणीय पवारसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही, असा आरोप ते करतात. पण चैत्यभूमीपासून (Chaityabhumi) अगदीजवळ राहत असूनही राज ठाकरे चैत्यभूमीवर आजवर का नाही गेले ? शाहू – फुले आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.