१८५७ च्या लढ्यात त्याचं खूप मोठं योगदान; आदित्य ठाकरेंचा फडणवीस यांना टोला

मुंबई: मुंबईच्या सोमय्या मैदानावर (Somaiya Ground) काल भाजपची पोलखोल सभा पार पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी या सभेला संबोधितकेले होते.  भोंगे (Loudspeaker) उतरवायला ज्यांची हातभर फाटते, ते म्हणतात आम्ही बाबरी (Babari Masjid) पाडली. काय विनोद आहे ? बाबरी पाडल्याबद्दल ज्या ३२ नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाले त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा. या आंदोलनात मीही सामील झालो होतो. तेव्हा शिवसेना (Shivsena) कुठे होती ? असा सवाल फडणवीस यांनी केला होता. बाबरी पाडली त्यावेळेला आपण तेथे उपस्थित होतो, असा दावा त्यांनी सभेत बोलताना केला होता.

यावर आता, शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ” १८५७ च्या लढ्यात (battle of 1857) त्याचं खूप मोठं योगदान आहे. स्वःतच. असो, पण या गोष्टीत जाण्यापेक्षा आणि वादात जाण्यापेक्षा राम मंदिर  (Ram Temple) चांगल होत आहे. कोर्टाने (Court)  निकाल चांगला दिला. शिवसेनेने संघर्ष केला. चांगल काम होत आहे. आता महाराष्ट्रासमोर बेरोजगारीचा (unemployment) प्रश्न आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोलल पाहिजे. चर्चा केली पाहिजे. आम्ही विकासाची कामं करत आहोत ”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.