राज ठाकरे यांचं मतपरिवर्तन हा पीएचडीचा विषय – संजय राऊत 

मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांची भोंग्यावर कारवाई केल्याने कौतुक केले होते. राज ठाकरे यांनी केलेलं हे कौतुक शिवसेनेला चांगलंच झोंबले आहे. यामुळेच  राज ठाकरे यांचं मतपरिवर्तन हा पीएचडीचा विषय असल्याचं खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यात आलेलं आहे. अशाच प्रकारचं पालन महाराष्ट्रातही करावं, अशीच सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्र सरकार नेहमीच न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतं, त्यामुळे हा भोंग्यांचा विषय आहे, तो राजकीय वातावरण तापण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ही भोंगेबाजी. आता योगी कोण? भोगी कोण? आणि हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला यावर पीएचडी करायची असेल, तर ती त्यांनी करायला हवी. फार इंटरेस्टिंग विषय आहे हा.असं राऊत यांनी म्हटले आहे.