Jayant Patil | एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी होऊ शकतो, जयंत पाटील हे काय बोलून गेले?

Jayant Patil | सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. यादरम्यान भाजपा मध्येही इनकमिंग सुरूच आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मोठे नेते भाजपाशी हातमिळवणी करू शकतात. दरम्यान शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मी एक कॉल करताच महायुती सरकारमध्ये मंत्री ( Mahayuti Government Minister) होऊ शकतो, पण शरद पवारांशी (Sharad Pawar) गद्दारी करणार नाही, असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रात अस्थिर असणाऱ्या भाजपला पश्चिम महाराष्ट्रातील आपले संघटन मजबूत करायचे आहे. म्हणून भाजपचे नेते आपल्याभोवती जाळे फेकत आहेत. एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रमही होऊ शकतो. परंतु ज्यांनी आपले राजकीय जीवन फुलवले आहे, अशा शरद पवारांसाठी आपण कोणताही त्याग करायला तयार आहोत,” असे जयंत पाटील म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार