सावधान! Whatsapp वर रेड हार्ट इमोजी पाठवल्यास होऊ शकतो, २० लाख रूपयांचा दंड

नवी दिल्ली : सोशल मीडिया संबंधात अनेक देशात वेगवेगळे नियम घालून दिले आहेत. त्या नियमांचा भंग केल्यास त्या व्यक्तींना शिक्षेची तरतूद देखील करण्यात आली आहे. यामध्ये आक्षेपार्ह्य भाषा वापरणे, हिंसेला प्रोत्साहन देणे अशा गोष्टी केल्यास शिक्षा-दंड होऊ शकतो. मात्र Whatsapp वर चँट करताना फक्त एक इमोजी पाठवल्यास त्याला २० लाख रूपयाचा दंड आणि ५ वर्षाच्या शिक्षेची तरतूद एका देशात करण्यात आली आहे.

एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, सौदी अरेबियामध्ये WhatsApp वर चँट करताना जर रेड हार्ट इमोजी पाठवल्यास संबंधित व्यक्तीला १,००,००० रियाल म्हणजे भारतीय रछपायात २० लाख दंड होऊ शकतो. त्याचबरोबर त्याला २ ते ५ वर्षाची तुरुंगाची हवा देखील मिळू शकते.

Whatsapp वर रेड हार्ट इमोजी पाठवल्यास एक प्रकारे समोरच्या व्यक्तीचा छळ आहे. आँनलाईन चँट करताना काही फोटो आणि इमोजी हे गुन्हांच्या प्रकारामध्ये येतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तींनी अशा पद्धतीचं वर्तन केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे, असं सौदी अरेबियाच्या एंटी फ्रॉड असोसिएशनचे सदस्य अल मोआताज कुतबी यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर Whatsapp सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे माध्यम आहे. या माध्यमाद्वारे आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला संदेश, फोटो, व्हिडीओ, महत्त्वाच्या फाईल्स इ. आपल्याला पाठवण्यास मदत होते. त्याचबरोबर आपण Whatsapp वरून फोन सोबत व्हिडीओ कॉलच्या द्वारे जगात कुठेही सवांद साधू शकतो. त्यामुळे या माध्यमावर सुरक्षितेच्या दृष्टीने विचार करण्यात आला आहे.