कामगारांच्या न्याय्य व हक्कांच्या मागण्या करिता भारतीय मजदूर संघाची महाराष्ट्रव्यापी मजदूर चेतना यात्रा

पुणे: कामगार कायद्यातील एकतर्फी बदल, कामगारांच्या कायम स्वरूपी रोजगारावर आलेली गदा, महाराष्ट्रातील असंघटित कामगारांवर कोणत्याही प्रकाराची सामाजिक सुरक्षा नसल्याने, विविध उद्योगातील वाढत चाललेले कंत्राटी कामगारांची मोठी संख्या, घटत चाललेली कायम स्वरूपी नोकरी अशा विविध प्रश्नांवर संघटित व असंघटित कामगारांच्या मागण्यां करिता भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशातर्फे दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रालय मुंबई येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे असून त्याची जनजागृती करण्यासाठी दि ६ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हामध्ये मजदूर चेतना यात्रेचे आयोजन केले आहे अशी माहिती पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे यांनी दिली.

या वेळी महाराष्ट्र प्रदेशचे संघटनमंत्री श्रीपाद कुटासकर, पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, चिटणीस बाळासाहेब भुजबळ, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री सचिन मेंगाळे,उमेश विस्वाद उपस्थित होते.

भारतीय मजदूर संघाने २१ डिसेंबर २०२२ मंत्रालय मुंबई येथे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी न्याय हक्कांच्या करिता कामगारांच्या भव्य मोर्चा काढणार असुन या मोर्चा द्वारे महाराष्ट्रातील संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रलंबित प्रश्ना बाबतीतच्या मागण्या राज्य शासनाकडे मांडणार आहे. महत्वपूर्ण मागण्या-

असंघटित कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा कोड त्वरित लागु करून सुरक्षा मंडळा मार्फत लाभ देण्यात यावा. कंत्राटी कामगार पध्दत बंद करून तेथे कार्यरत रिक्त जागांवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांची कायम स्वरूपी नियुक्ती करावी, तसेच राजस्थान, ओडिसा,हरियाणा, पंजाब राज्याप्रमाणे कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करावे.
घरेलु कामगार कल्याण मंडळाचे काम बांधकाम कल्याण मंडळामार्फत सुविधा, लाभ देण्यात यावेत.

अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांच्या मानधनात वाढ करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

बिडी उद्योगातील कामगारांना किमान वेतना ची प्रभावीपणे अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी.

ई पी एफ पेंशन दरमहा रू ५००० करण्यात यावी व महागाई भत्ता देण्यात यावा.

राज्य सरकारी कर्मचारी करिता जुनी पेंशन योजना लागु करण्यात यावी.

पेट्रोल, डिझेल व गॅस यांना जी एस टी च्या कक्षेत आणुन महागाई वर नियंत्रण आणावे.
संरक्षण उद्योगांचे खाजगीकरण मागे घेण्यात यावे.

बॅंक व एल आय सी चे खाजगीकरण मागे घेण्यात यावे.
महाराष्ट्रातील प्रलंबित उद्योगातील प्रलंबित किमान वेतन वाढ त्वरित घोषित करण्यात यावी.

या महत्त्वाच्या मागण्या करिता दि २१ डिसेंबर २२ रोजी मंत्रालय मुंबई येथे मोर्चा आयोजित केला आहे.

ह्या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी भारतीय मजदूर संघाने दिनांक ६ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२२ या काळात महाराष्ट्र मध्ये मजदूर चेतना यात्रेचे आयोजन केले आहे त्यांची सुरवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमी किल्ले शिवनेरी येथून दि ६
नोव्हेंबर २२ रोजी सकाळी १० होणार आहे. दोन विभागात चेतना यात्रेचे नियोजन असून पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग जावून समारोप दि १७ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे होणार आहे. दुसरी यात्रा शिवनेरी पासून नाशिक जळगाव मार्ग ने मराठवाडा विभाग करुन समारोप अहमदनगर येथे होणार आहे. या मध्ये विविध उद्योगातील संरक्षण, वीज, बॅंक, कंत्राटी कामगार, घरेलु कामगार, बांधकाम कामगार, सुरक्षा रक्षक, खाजगी कारखाने,इ उद्योगातील पदाधिकारी व कामगार उपस्थित रहाणार आहेत.

अशी माहिती पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे,यांनी दिली.या प्रसंगी प्रदेश संघटन मंत्री श्रीपाद कुटासकर,पुणे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सचिव बाळासाहेब भुजबळ, कार्याध्यक्ष अभय वर्तक, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे नीलेश खरात,अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री सचिन मेंगाळे, बिडी ऊद्योगातील उमेश विस्वाद यांची उपस्थिती होती.